Commonwealth Games 2026 : क्रिकेटच्या ‘या’ फॉरमॅटचा कॉमनवेल्थ गेम्समध्ये समावेश
Updated On:

मेलबर्न – राष्ट्रकुल क्रीडा (कॉमनवेल्थ गेम्स) स्पर्धा 2026 सालचे यजमानपद ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया शहराला मिळाले असून या स्पर्धेत टी-20 क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, ही स्पर्धा केवळ एकाच शहरात होणार नसून मेलबर्न, झिलॉंग, बेलार्ट व जिप्सीलॅंड या शहरांमध्येही विविध क्रीडाप्रकारातील सामने होणार आहेत. एकाच शहरात स्पर्धा खेळवण्याचा इतिहास या स्पर्धेपासून बदलला जाणार आहे.
या सर्व शहरांत खेळाडूंसाठी क्रीडा ग्रामची सुविधा निर्माण करण्यात येत असून स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) तब्बल एक लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार आहे, अशी माहिती राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) दिली. या स्पर्धेसाठी 16 क्रीडा प्रकारांची यादी जाहीर करण्यात आली असून टी-20 क्रिकेटचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.





