Pune District : महाळुंगे इंगळेत पाच गोवंशांना जीवदान

राजगुरुनगर : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल भीमाशंकर, जिल्हा गोरक्षा विभाग यांनी पोलिसांच्या मदतीने कत्तलीसाठी घेऊन चालेल्या 5 गोवंशाना जीवदान दिले. या 5 गोवंशाना श्री माऊली गोशाळा येथे सुखरूप सोडवण्यात आले. यावेळी शाळेचे मोलाचे सहकार्य केले.
एका महिंद्रा पीक-अप गाडीमधून 5 गोवंश कत्तल करण्याकरिता छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जात आहेत, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पिकअप(एमएच 46 आर 1735) वर कारवाई करावी, अशी विनंती महाळुंगे इंगळे पोलिसांना केली होती.
त्यानुसार पोलिसांनी कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे पिकअप आणि त्यातील व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सतीश देवराव बत्तीसे, नवनाथ लिंबाजी नवले यांना अटक केली असून पोलीस तपास पोलीस हवालदार पी. एस. लोखंडे हे करत आहेत.
या कारवाईत मानद पशुकल्याण अधिकारी अॅड. निलेश आंधळे यांचे सहकार्य लाभले तर गोरक्षक बाबाजी पिंगळे, आदित्य अरगडे, अथर्व भुजबळ, साहिल भुजबळ, ओंकार जाधव, हर्षल भुजबळ, कौस्तुभ चौधरी, अजय भुजबळ, शंतनू पमपटवार, दर्शन भुजबळ, संदेश जाधव, निरज पवार, करण दंडवते, सुयश गायसमुद्रे, प्रथमेश मुंगसे, सचिन पोतले, शुभम बोर्हाडे, विवेक वाळुंज,ओंकार कावडे, दीपक गावडे, चंद्रकांत साळुंके, अवधूत चौधरी या कारवाईत सहभागी झाले होते.





