पुणे जिल्हा | अत्याचाराच्या घटनांत फाशीची शिक्षा द्या- खासदार सुप्रिया सुळे

कुरकुंभ, (वार्ताहर) – मळद (ता. दौंड) येथील मधील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील एका इंग्रजी विषयाचे अध्यपान करणाऱ्या शिक्षकाकडून विद्यालयातील विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला.
यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी शाळेत भेट दिली. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत त्यांनी चर्चा केली.
सोबत वर्गात जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्याशी चर्चा केली आहे.
यावेळी सुळे यांनी शरद पवार झेड प्लस सुरक्षा, जय पवार बारामती दौरे, नाना पटोले नाराजी, बदलापूर बाहेरचे आंदोलन, फेक नॅरेटिव्ह आदी मुद्दयांवर टीकेची झोड उठविली.
मळद येथील शाळेतील शिक्षकाचे विकृत वर्तन पालकांनी आणि मुलींनी उघड केले. शिक्षकाचे विकृत वागणं हे अनेक दिवसांपासून सुरू होते.
पुणे ग्रामीण पोलिसांचे आभार मानते. पुणे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेने जलद पद्धतीने काम केले. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, अशा आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बदलापूर येथील पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीवर त्या म्हणाल्या की, पोलीस अधिकाऱ्याची बदली करून हा प्रश्न सुटणार नाही. गृहमंत्र्यांनी याबाबतीत थोडसे संवेदनशील झाले पाहिजे, अशी झाली आहे की आम्हाला तुमचे लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये नको.
आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो. पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा. राज्य सरकार 200 कोटींची जाहिरात करू शकतो. मात्र तोच निधी पोलिसांना शाळांना किंवा शिक्षकांना खर्च करू शकत नाही बदलीची जबाबदारी गृहमंत्री यांनी स्वतः घेतली पाहिजे. खालच्या सगळ्या यंत्रणांच्या बदल्या करून त्यांची याच्यातून मुक्तता नाही.
मुख्यमंत्र्यांनी बोलणं योग्य नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, कोणत्या केसमध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांत फाशी दिली सांगा. तरी आम्हालाही माहिती कुठेच मिळत नाही. एवढ्या मोठा पदाच्या माणसांनी बोलणं अयोग्य आहे.
जी घटना बदलापूरला आणि दौंडमधील मळदमध्ये झाली. त्यांना दोन महिन्यांच्या आतच फाशी द्या. मग काहीतरी महाराष्ट्र मॉडेल केले तर ते सगळीकडे व्हावे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
महिलांच्या सुरक्षावर सरकार नाकाम
स्पर्धा परीक्षेच्या आंदोलनावर सुळे म्हणाल्या की, रोहित पवार एमपीसी आंदोलनात सक्रिय आहेत. कष्ट करून शिकणाऱ्या मुलांना फसविले जात आहे.
लाडकी बहीण योजना घेऊन सरकार फक्त फिरतयं. परंतु भ्रष्टाचार, महागाई आणि महिलांची सुरक्षा यावर सरकार नाकाम झाले आहे. नाती ही 1500 रुपयांनी विकत घेता नाही. नात्याचा अपमान म्हणजे लाडकी बहीण योजना आहे.




