साठ वर्षांवरील नागरिकांना पीएमपीएल तिकीटामध्ये सवलत द्या – नगरसेवक आदित्य माळवे
Updated On:

पुणे – पीएमपीएमएलमध्ये 65 वर्षांवरील नागरिकांना प्रवास करण्यासाठी तिकीटात सवलत देण्यात येतो. ही सवलत 60 वर्षांवरील नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक आणि वृक्ष प्राधिकरण समिती, पुणेचे सदस्य आदित्य माळवे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. या मागणीची प्रत पीएमपीएमएल संचालकांना देण्यात आली आहे.
60 व्या वर्षी नागरिकांना सेवानिवृत्ती मिळते. मात्र, पीएमपीएमएलमध्ये 65 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना तिकिटामध्ये सवलत देण्यात येतो. निवृत्तीनंतर तब्बल पाच वर्षे नागरिकांना तिकिटात सवलत मिळत नाही. त्यामुळे 60 ते 65 वयोगटातील नागरिकांची गैरसोय होत आहे. याचा विचार करून 60 वर्षांवरील नागरिकांना पीएमपी तिकीटामध्ये सवलत देण्याची ही मागणी माळवे यांनी केली आहे.





