Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ढोल वादनाचा ठेका
Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होताच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवत मिरवणुकीचा आनंद घेतला.

Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होताच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवत मिरवणुकीचा आनंद घेतला. ढोल-ताशांच्या गजरात महाजन यांनी स्वतः ढोल वाजवत ठेका धरला.
नाशिकमध्ये अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरवणुकीत विविध गणेश मंडळे सहभागी झाली असून, ढोल-ताशांच्या तालामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. याचवेळी महाजन यांनी ढोलवादनात सहभाग घेतला.
महाजन ढोल वाजवत असल्याचे दृश्य पाहण्यासाठी उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांचीही उत्सुकता दिसून आली. दरम्यान, नाशिकमधील विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाने वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने विशेष नियोजन केले आहे.
गणेशभक्तांच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात नाशिकच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला वेग आला आहे.





