Ghajini 2 : आमिर खान आणि सुर्या ‘गजनी 2’मध्ये एकत्र दिसणार; सिनेमाबद्दल सर्वात मोठी अपडेट आली समोर, दिगदर्शकाने सांगितलं…

Ghajini 2 | Aamir Khan : बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा ‘गजनी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. 2008 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जवळपास 100 कोटींची कमाई केली होती. आता लवकरच या सिनेमाचा सीक्वल बनणार आहे. विशेष म्हणजे ‘गजनी 2’ मध्ये साऊथचा मोठा सुपरस्टार आमिरसोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन आणि तमिळ व्हर्जन दोन्ही एकाच वेळी शूट केले जाणार आहेत.
आमिर खानसोबत साऊथ सुपरस्टार अभिनेता सुर्या दिसण्याची चर्चा आहे. ‘गजनी’ हा मूळ सिनेमा साऊथमध्ये पहिल्यांदा बनवला गेला. या सिनेमात सुर्याने प्रमुख भूमिका साकारली होती. दरम्यान, आता अशा बातम्या येत आहेत की एआर मुरुगदास आमिर खानसोबत गजनी २ वर काम करायला सुरुवात करणार आहेत. स्वतः त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
एआर मुरुगदास यांनी २००८ मध्ये आमिर खानचा ‘गजनी’ चित्रपट दिग्दर्शित केला होता हे फार कमी लोकांना माहिती असेल. १०० कोटी रुपये कमावणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. १७ वर्षांपूर्वी आलेला ‘गजनी’ हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट होता.
या चित्रपटात अभिनेता आमिर खानसोबत अभिनेत्री असिन मुख्यभूमीकेत झळकली होती. ए.आर. मुरुगदास यांनी गजनी २ बद्दल चर्चा केली. निर्माते अल्लू अरविंद यांनी चित्रपट पुढे नेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर या बातम्यांना आणखी वेग आला आहे.
२००५ मध्ये सूर्या अभिनीत तमिळ चित्रपट ‘गजनी’ २००८ मध्ये आमिर खानसोबत हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला, जो बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा ओलांडणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. तो एक ऐतिहासिक चित्रपट ठरला.
अलिकडच्या अहवालांमधून असे दिसून आले आहे की ‘गजनी २’ हा एक द्विभाषिक प्रोजेक्ट असेल, जो एकाच वेळी तमिळ आणि हिंदीमध्ये चित्रित केला जाईल, ज्यामध्ये सूर्या आणि आमिर खान आपापल्या भूमिका पुन्हा साकारतील.
या विषयी बोलतांना दिग्दर्शक म्हणाले, “आमच्याकडे काही कल्पना आहेत. सध्या, आम्ही सर्वजण आपापल्या प्रकल्पांमध्ये व्यस्त आहोत. वेळ मिळताच, आम्ही बसून चर्चा करू.” या संभाषणात मुरुगदासने आमिर खान सोबतच्या भेटीबद्दल सांगितले की,
“जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो, तेव्हा सिकंदरचे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी मी त्याला भेटलो होतो. मी त्याला सितारे जमीन परच्या सेटवर भेटलो होतो आणि आम्ही काहीतरी चर्चा केली. त्यानंतर, आम्ही अनेकदा फोनवर बोलतो. असं त्यांनी सांगितलं.





