Rupali Patil : ‘BMW सारख्या गाडीतून उतरुन रस्त्यावर बाथरुम करतोय, किती निर्लज्ज’…, रुपाली पाटील आक्रमक

पुणे : पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एका बड्या व्यावसायिक बापाच्या मुलाने एक अत्यंत घृणास्पद वर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे पुण्यात पोलिसांचा धाक राहिलाय का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका महागड्या गाडीत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने महिलांना अश्लिल चाळे केले आहेत. तसेच या तरुणाने चौकात सिंग्लनला गाडी थांबवत लघू शंका देखील केली आहे.
या अत्यंत घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. BMW कार चालवणाऱ्या तरुणाचं नाव गौरव मनोज अहुजा असल्याची माहिती आहे. आज शनिवारी सकाळी म्हणजेच ऐन जागतिक महिला दिनीच पुण्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. केला आहे.
येरस्त्यावर बाथरुम करतोय, किती निर्लज्ज
रुपाली पाटील म्हणाल्या, विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात गुन्हेगारी लोकांची विकृती वाढली आहे. BMW सारख्या गाडीतून उतरुन रस्त्यावर बाथरुम करतोय, किती निर्लज्ज आहे. यांना संस्कार नावाची गोष्टच नाहीये. एवढ्या मोठ्या गाडीत बसलाय, शिक्षण तर झालं असणारे, कुठेही सार्वजनिक शौचालयात जाऊ शकला असता, एवढाच पैशांचा माज असेल, तर हॉटेलमध्ये जाऊ शकला असता, पाच रुपयांऐवजी शंभर रुपये देऊन लघुशंका केली असती, असा संतप्त सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे.
विकृती दिवसेंदिवस फोफावत चाललीय
ही विकृती दिवसेंदिवस फोफावत चालली आहे, माध्यमांनी समोर आणल्यावर पोलीस कारवाई करतील. कारवाई निश्चितच होणार आहे. लोकांनी लक्षात घ्यावे, की आपण असे काही केले तर, कायद्याची जरब बसणार आहे, एकालाही सोडता कामा नये, पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे पीआय साहेब आहेत, त्यांनी त्यांच्या भागावर नियंत्रण आणि लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सगळं उठसूठ पोलीस आयुक्तांना आम्ही सांगायचे. हे प्रकार चालणार नाही. प्रतिबंधात्मक कारवाई करणे, सीसीटीव्हीवर देखरेख करणे गरजेचे असल्याचे रुपाली पाटील म्हणाल्या.
सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली : गौरवचे वडील
पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं मनोज अहुजा यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर संताप
या घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक उरला आहे का असा प्रश्न या प्रकारामुळे विचारण्यात येत आहे.




