Gautam Gambhir Shocked : रोहित-विराटची ‘क्रेझ’ पाहून गौतम गंभीरही चकित! व्हायरल व्हिडिओची क्रीडा विश्वात चर्चा

Gautam Gambhir Shocked looking Rohit Virat Craze in Vadodara : नवीन वर्षातील पहिल्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून, ११ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया वडोदऱ्यात दाखल झाली आहे. मात्र, सरावापेक्षा सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे ‘किंग’ विराट कोहली आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्मा यांच्यासाठी जमलेल्या अफाट गर्दीची. चाहत्यांचे हे वेड पाहून खुद्द मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गंभीरची ‘ती’ रिअॅक्शन ठरली चर्चेचा विषय –
भारतीय संघ बसमधून जात असताना रोहित आणि विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी केली होती. चाहत्यांचा हा जल्लोष आणि ‘वेड’ पाहून प्रशिक्षक गौतम गंभीरच्या चेहऱ्यावरील हावभाव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
“Gautam Gambhir will end superstar culture in India” 😂🤣🔥
Look at Gambhir’s face after seeing the craze for Rohit Sharma and Virat Kohli 😭💉
— Rohan💫 (@rohann__45) January 8, 2026
गंभीरने नेहमीच ‘व्यक्तीपूजे’पेक्षा संघाला महत्त्व देण्याची भूमिका मांडली आहे. मात्र, वडोदऱ्यातील चाहत्यांचे रोहित-विराटवर असलेले अफाट प्रेम पाहून गंभीरलाही आश्चर्याचा धक्का बसला. व्हायरल व्हिडीओमध्ये गंभीर ही गर्दी पाहून थक्क झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
हेही वाचा – Jay Shah Statement : ‘रोहितच आमचा कर्णधार!’; सूर्या समोर असतानाच जय शाह यांनी असं का म्हटलं? पाहा VIDEO
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक –
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून वडोदरा येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. त्यानंतर टी-२० मालिकेला २२ जानेवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरुवात होणार. भारतीय संघाने वनडे मालिकेसाठी मैदानावर कसून सराव सुरू केला आहे.
रोहित-विराटसाठी २०२६ चे आव्हान –
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी व टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याने ते आता केवळ वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. २०२५ मध्ये या जोडीने धावांचा पाऊस पाडला होता. आता २०२७ च्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर, मर्यादित वनडे सामने मिळणार असल्याने या अनुभवी जोडीसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. वर्षाची सुरुवात दणक्यात करण्यासाठी हे दोन्ही दिग्गज खेळाडू सज्ज झाले आहेत





