nagar | ऑगस्ट महिन्यात बहुजन समाजाचा मेळावा

पारनेर, (प्रतिनिधी) – आगामी विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पारनेरमध्ये यावेळी विधानसभा निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
पारनेरमधील आक्रमक ओबीसी नेते प्रसाद खामकर यांनीही विधानसभा निवडणूकीमध्ये उतरण्याचे संकेत दिले आहेत. आॅगस्ट महिन्यात बहुजन समाजाचा मेळावा घेऊन खामकर घोषणा करणार आहे.
पारनेर-नगर मतदारसंघांमधील विविध मागणीसाठी, प्रश्नासंदर्भात ओबीसी नेते प्रसाद खामकर सरकार दरबारी संघर्ष करत आले आहेत. शोषित, उपेक्षित बहुजनांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे एकमेव लक्ष्य घेऊन खामकर हे कार्य करत आले आहेत.
पारनेरमधील शोषित, वंचित, उपेक्षित बहुजनांच्या हक्क, अधिकारांसाठी विधानसभा निवडणूक लढणार आहे. त्यासाठी महायुतीकडे आणि वंचित बहुजन आघाडीकडे खामकर यानी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.





