Ganpati Visarjan 2024 | आज गणेशोत्सवाची सांगता होत आहे. अनंत चतुर्दशी निमित्त शहरांमध्ये संपूर्ण हे आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडवर कला अकादमी यंदा रांगोळीच्या माध्यमातून एक आगळावेगळा संदेश देण्यात आला आहे.
पुण्यात मागच्या काही महिन्यापूर्वी ड्रग्सचे मोठे रॅकेट सापडले होते. त्याच ड्रग्सच्या थीमवर आधारित लक्ष्मी रोडवर कला अकादमीने आगळावेगळा संदेश दिला आहे. “पुण्यात जी तरुणाई ड्रगच्या विळख्यात सापडली आहे ती बाहेर पडू दे” … पुण्यामधील जी काही संकट येतात ती देखील दूर होऊदे ,” असे या रांगोळीच्या माध्यमांतून लाडक्या गणेशला अर्चना करण्यात आली आहे.
दरम्यान , यंदाच्या गणेश विसर्जनासाठी सर्व पुणेकर सज्ज झाले आहेत. सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक याशिवाय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग या सगळ्या गोष्टींचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे.
.