गणपती बाप्पा मोरया !!! राज्यात आनंदाचे वातावरण; ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात

Ganesh Chaturthi 2025 | गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांनी रांग लावली होती. तर पुण्यातही दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी आहे. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले जात आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक पद्धतीने वाद्यनाच्या गजरात या गणपती मंडळाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. मोरया मोरयाच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमला आहे.
तर मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये विराजमान करण्यात आली आहे. या मिरवणुकीत संघर्ष ढोल ताशा पथक, श्रीराम ढोल ताशा पथक, अभेद्य ढोल ताशा पथक यांचा सहभाग असणार आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना सवितानंद महाराज यांच्या हस्ते ११ वाजून ३७ मिनिटांनी करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा
पुण्यात मिरवणुकीमधील ढोल ताशा पथकाच्या सुरेख वादनाने नागरिकांची मन जिंकली. तरुण वर्गात मोठा जल्लोष यावेळी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा दिला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. Ganesh Chaturthi 2025 |
हेही वाचा:





