गणेश कवडे यांची भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती; ओझरमध्ये जल्लोषात स्वागत

ओझर : भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची घोषणा आज शुक्रवारी करण्यात आली. यामध्ये गणेश कवडे यांची भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे ओझर गावात उत्साहाचे वातावरण पसरले असून, गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत कवडे यांचे जंगी स्वागत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल, आमदार योगेश टिळेकर, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, महामंत्री मकरंद देशपांडे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर झाली.
गणेश कवडे यांनी अश्वमेध युवा मंचातून तालुक्यातील युवाशक्ती एकत्रित केली असून, श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मंदिराचा कायापालट केला आहे. “गावकऱ्यांचे प्रेम आणि पाठबळ माझी ऊर्जा आहे. पुणे जिल्ह्यातील युवाशक्तीला संघटित करून भाजपचा झेंडा उंच फडकवू,” असे कवडे यांनी सांगितले.





