पुणे जिल्हा | भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र तांबे

शिक्रापूर, (वार्ताहर)- पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील राजेंद्र दादाभाऊ तांबे यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी राजेंद्र तांबे यांना नियुक्ती पत्र दिले आहे.
पिंपळे जगताप येथील राजेंद्र तांबे यांनी भाजपात सक्रीय राहून नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सातव यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा सरचिटणीस भगवान शेळके, संदीप भोंडवे यांच्या हस्ते राजेंद्र तांबे यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अशोक शेळके, महेश जगताप, विश्वास जगताप, लक्ष्मण तांबे, रवी जगताप,
अक्षय सोंडेकर, स्वराज जगताप, योगेश तांबे, विशाल परांडे उपस्थित होते. निवडीनंतर बोलताना पक्ष संघटना मजबूत करत पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तांबे यांनी सांगितले.




