भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या कार्यकारी अध्यक्षपदी गणेश कवडे यांची नियुक्ती

ओझर – भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या कार्यकारी अध्यक्षपदी गणेश कवडे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गणेश कवडे यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप मोरे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप, भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, भाजपा नेत्या व विधानसभा प्रमुख आशा बुचके, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, जिल्हा सरचिटणीस ताराचंद कराळे, जिल्हा सरचिटणीस संजू रौंदळ, जिल्हा सरचिटणीस आशिष माळवदकर, उपजिल्हाध्यक्ष भगवानराव घोलप, तालुकाध्यक्ष संतोष खैरे, डॉ. पंजाब कथे, दिलीप गांजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
गणेश कवडे म्हणाले, “माझ्यासारख्या एका सामान्य युवकाला ही संधी दिल्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचे अत्यंत आदरपूर्वक आभार मानतो. भारतीय जनता पक्षाचे ब्रीदवाक्य ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ याप्रमाणे मी कार्य करेन, अशी ग्वाही सर्वांना देतो. माझ्या कार्यक्षेत्रात युवा मोर्चाचे संघटन आणखी बळकट करण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने काम करेन. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे, तसेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रही विकासाच्या दिशेने मोठ्या पावले टाकत आहे. अशा स्थितीत पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या युवकावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी निश्चितच सार्थ करून दाखवीन.”





