पुणे जिल्हा | बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या नावाने गणेश फेस्टिवल

बारामती ( प्रतिनिधी) – यंदा बारामती शहरात मुख्यमंत्र्यांच्या नावाने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले आहे. ५१ शासकीय योजनांचा मेळावा हे फेस्टिवलचे आकर्षण आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार दहा दिवस हे उपक्रम राबविला जाणार आहे.मुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते (दि. ८) रोजी फेस्टिवलचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आयोजक शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बारामतीमध्ये यंदा गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुमित्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.
शहरातील शारदा प्रांगण येथे या गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
विविध योजनांचे ५१ स्टॉल उभारले जाणार आहेत. गणेश फेस्टिवल ला भेट देणाऱ्या नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी देखील उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
शारदा प्रांगण येथे नागरिकांसाठी शासकीय योजनांची माहिती सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत मिळणार आहे. सायंकाळी सहा नंतर सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील बारामतीकरांना उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बारामती शहरात प्रथमच एकनाथ गणेश फेस्टिवलचे आयोजन केले आहे. याबाबतची सर्व माहिती त्यांना देण्यात आली आहे.
सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी तसेच त्यांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
दहा दिवस हा उपक्रम सुरू राहणार आहे. गणेश फेस्टिवल दरम्यान पुण्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील फेस्टिवलला भेट देणार आहेत. -सुरेंद्र जेवरे, शिवसेना प्रमुख, पुणे जिल्हा





