पुणे जिल्हा | पाच वर्षांत पाच हजार कोटींचा निधी आणला

राजगुरूनगर, (प्रतिनिधी)- पाच वर्षांत आम्ही पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणला. विकास कामे मार्गी लावली. आम्ही तालुक्यात 1 लाख 10 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेंतर्गत दीड हजार रुपये महिना सुरु करून त्यांचा सन्मान करीत आहोत.
तालुक्यात अनेक पूल अनेक रस्ते बांधले, अनेक सेवा सुविधा निर्माण केल्या आहेत. पण जनतेची फसवणूक केली नाही, असा दावा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा गावभेट दौरा खेडच्या पश्चिम भागात झाला यावेळी भोमाळे खालचे येथे रविवारी (दि. 20) झालेल्या कोपरा सभेत आमदार दिलीप मोहिते पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण मुके,
शामराव वाळुंज, खेड बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंभोरे, नवनाथ होले, माजी उपसभापती विठ्ठल वनघरे, संचालक जयसिंग भोगाडे, पपू टोपे, हनुमंत कड, जिप माजी सदस्या मंगल चांभारे,
सुरेश शिंदे, जयसिंग दरेकर, प्रताप ढमाले, तात्या धायबर, अभि शेंडे, वैशाली जाधव, सुजाता पचपिंड, अंकुश शिंदे, रामदास सावंत, मनोहर शिंदे, तानाजी भोकटे, योगेश भोकटे भगवान भोमाळे, रामू शिंदे,
शंकर सावंत, जयराम सावंत, सागर वाजे, किरण भोमाळे, लीलाबाई सावंत, सीताबाई भोमाळे, सदाशिव भोमाळे, एकनाथ जाधव, बाळासाहेब जाधव, गबाजी मराडे, विजय भोमाळे, बाळासाहेब भोमाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, अजितदादा आपल्या सोबत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील काहीजण महिलांना साड्या वाटप करीत आहेत.
सुरतच्या लिलावात खरेदी केलेल्या साड्या वाटून ते महिलांची चेष्ठा करीत आहेत. ते पाच वर्षांत केवळ एक साडी देत आहेत. मी कायम लोकांच्या सेवेसाठी काम करीत आहे. त्यामुळे तालुक्यात आता कितीही कोल्हेकुई होऊद्या मीच निवडून येणार.
आमदार मोहिते म्हणाले, येळवली सारख्या गावातील 80 लोकांसाठी 9 कोटी रुपये निधी रस्ता करण्यासाठी खर्च केले. त्यासाठी 3 मोठे पूल केले आयुष्यात या ग्रामस्थांसाठी कोणी केले नसते.
मात्र मी ते करून दाखवले. जनतेसाठी मी काहीच कमी केले नाही आता त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे त्यांनी मला कमी पडू देऊ नये, माझ्या पाठीशी ठाम पणे उभे राहावे.
पाच वर्षात तुमच्या परीक्षेला उतरलो त्यात मी कुठेही कमी पडलो नाही आता येणार्या निवडणुकीत मला साथ द्या असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील दिवंगत चिमाबाई लक्ष्मण शिंदे यांच्या शोकसभेनंतर त्यांची मुले सामाजिक कार्यकर्ते अंकुश व आनंद लक्ष्मण शिंदे याची भेट घेत सांत्वन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश शिंदे यांनी केले. मनोहर शिंदे यांनी आभार मानले.





