पुणे जिल्हा | स्त्री हा एक पंरपंचेचा कणा -आमदार मोहिते

चिंबळी, (वार्ताहर) – खऱ्या अर्थाने संकटावर मात करण्याचे साम्रार्थ हे स्त्री शक्तीकडे आहे. स्त्री हा एक पंरपंचेचा कणा आहे कणा जर मजबूत असेल तर प्रपंच सुखी झाल्याशिवाय राहत नाही. स्त्री हे शक्तीचे स्वरूप आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
मोई (ता. खेड) येथील नवनिर्माण प्रतिष्ठानाच्या वतीने नवरात्रोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या न्यू होम मिनिस्टर सिने अभिनेता क्रांती मळेगांवकर व बाल गायिका टिव्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर लिखित खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रसंगी आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य शांताराम सोनवणे, माजी अध्यक्ष आनंद गवारी, पोलीस पाटील निखील रोकडे, जालिंदर गवारी, सोमनाथ गवारी, रवींद्र गवारी, शैलेश फलके, विजय गवारी, संतोष येळवंडे, मंगेश गवारी, राहुल गवारी, मारुती येळवंडे, आदी मान्यवरांसह सर्व संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन नवनिर्माण प्रतिष्ठानाच्या वतिने माजी अध्यक्ष समीर गवारे यांनी केले होते. या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या स्पर्धेसाठी दोन ऑक्टिव्हा, एक फ्रिज, दोन एलसीडी, एक तोळा सोन्याचे दागिने, ड्रेस मटेरियल, पैठणी अशी भरघोस बक्षीस देण्यात आली.
आमदर मोहिते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर खेड तालुक्यातील 1 लाख 10 हजार महिलांना प्रति महिना 15 रूपये सुरू केले असून अजूनही ही योजना सुरू असून या योजनेत एक ही महिला वंचित राहणार नसून राहिलेल्या महिलांनी अंगणवाडीत जाऊन फॉर्म भरावा,
काही अडचण आल्यास मला सांगा सोडविण्याचे काम मी स्वतः करणार आहे. महिलांच्या खात्यात अजून आकडा वाढवायचा असेल तर आपल्या पुन्हा अजित दादांना सत्तेवर आणले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामस्थांकडून आमदारांचा सत्कार
राष्ट्रपती द्रौपती मुर्मु यांच्या हस्ते आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्राप्त झाल्याने नवनिर्माण प्रतिष्ठानाच्या वतिने आमदार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुणेरी पगडी घालून भव्य सत्कार करण्यात आला.





