पुणे जिल्हा | काम करणारी माणसे थांबली तर…

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत अनेक लुंगे-सुंगे खुप येतील; परंतु कामे येतील का? म्हणून काम करणार्या माणसाच्या मागे उभे रहा तरच विकास होईल. काम करणारी माणसे थांबली तर पश्चिम भागातील विकासाला बाधा येईल, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
चिखलगाव (ता. खेड) येथे रविवारी (दि. 13) शासकीय आश्रम शाळेच्या इमारतीचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते पश्चिम भागातील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कैलास सांडभोर, खेड बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंभोरे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे, संचालक जयसिंग भोगाडे, पप्पू टोपे, हनुमंत कड, रणजित गाडे, विलास कातोरे,
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगल चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला अध्यक्षा संध्या जाधव, अरुण मुळुक, विनायक घुमटकर, बाळासाहेब गोपाळे, लक्ष्मण मुके, शामराव वाळुंज, युवराज बंदावणे, चंद्रकांत इंगवले,
लक्ष्मण तिटकारे, वैभव नाईकरे, महेश बच्चे, चिखलगावच्या सरपंच शोभा गोपाळे, उपसरपंच प्रमिला गोपाळे, सुजाता पचपिंड, रोहीणी गवारी, किशोर बांगर, कैलास गोपाळे, वैशाली जाधव, लता गोपाळे, सुगंधा शिंदे,शिवाजी मोरे, आदिवासी विभाग उपअभियंता भारत तांबे,
शाखा अभियंता विशाल जगदाळे, सहायक प्रकल्प अधिकारी आकाश शिंदे, ठेकेदार सुधीर कातोरे, हेमंत पाटील, विराज मोरे, मुख्याध्यापक दादासाहेब ढेरे यांच्यासह चिखलगाव ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आश्रम शाळेचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले की, पश्चिम भागातील अनेकलोकांनी धरणासाठी योगदान दिले; परंतु त्यांना आवश्यक सुविधा दिल्या गेल्या नाही त्यामुळेच लोकांना हाल सहन करावे लागले.
पश्चिम भागात दोन उपसा सिंचन प्रकल्प राबवण्यात येणार असून त्याचे लाइटबील हे सरकार भरणार असून आदिवासी भागाला मोठे फायदा होणार आहे. चिखलगाव येथील शासकीय आश्रमशाळा इमारत बांधण्यासाठी 25 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर करून आणला.
आम्ही काम करणारी माणस आहोत. आदिवासी दुर्गम भागात शिक्षणाची गंगा पोहोचविली.शहरात ज्याप्रकारे सुविधा आहेत त्याच सुविधा आम्ही आदिवासी भागातील मुलांच्या देत आहोत. विकासाची प्रकिया निरंतर सुरू असते, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब गोपाळे यांनी तर सूत्रसंचालन करून दत्ता शिंदे यांनी आभार मानले.
हे पैसे परत घेण्यासाठी नाही तर…
शिक्षणामुळे पिढ्या घडत असतात लाडकी बहीण योजना आणली. 65 वर्षांच्या महिलांना पेन्शन योजना सुरू होणार आहे. हे पैसे परत घेण्यासाठी नाही तर आयुष्यभराची ओवाळणी सरकारने दिली आहे.
महिला पैशांची बचत करतात, पुरुष पैशांची बचत करत नाहीत आमच सरकार एवढ करत आहे मग तुमचा सरकारला पाठींबा मिळायला हवा, असे आवाहन आमदार मोहिते यांनी केले.
या कामांचे भूमिपूजन, उद्घाटन
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या जनसंवाद दौर्यात राजगुरूनगर क्रीडा संकुल जलतरण तलाव (6 कोटी 19लाख), चिखलगाव येथे आदिवासी आश्रम शाळा व वसतीगृह (21 कोटी),
वेताळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटन व रस्त्याचे (16 कोटी 74 लाख), शेलपिंपळगाव येथे शेलपिंपळगाव ग्रामपंचायत इमारत (1 कोटी 60 लाख रुपये) या कामांचे उद्घाटन भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.




