एफटीआयआयच्या ‘नभ अभिप्सा’ धातूशिल्पाचे राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते अनावरण

पुणे – हिरक महोत्सवी वर्ष( हीरक महोत्सवी-1960-2020) साजरे करीत असलेल्या पुणे येथील भारतीय फिल्म व टेलिविजन संस्थेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (19 जानेवारी ) भेट दिली तसेच तेथील प्रांगणात उभारलेल्या ‘नभ अभिप्सा’ या धातूशिल्पाचे अनावरण केले. तसेच एफटीआयआय संस्थेची पाहणी देखील केली.
आपल्या स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या पुणे येथील भारतीय फिल्म व टेलिविजन संस्थेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भेट दिली तसेच तेथील प्रांगणात उभारलेल्या ‘नभ अभिप्सा’ या धातूशिल्पाचे अनावरण केले. pic.twitter.com/yGRbmFfXJ0
— Governor of Maharashtra (@maha_governor) January 19, 2021
दरम्यान, नभ अभिप्सा हे धातूशिल्प जुने स्टुडिओ लाईटस, आर्क लाईटस, वापरात नसलेले ट्रॅक व इतर टाकाऊ सामग्रीपासून तयार केले आहे. संस्थेच्या छायांकन व कला दिग्दर्शन व निर्मिती डिझाईन विभागाने ही शिल्प तयार केले.





