मित्रांनो, मी आयुष्याला कंटाळलो..! पोस्ट लिहून १७ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

नाशिक – सोशल मीडियावर जीवनाबद्दलची निराशा व्यक्त केल्यानंतर १७ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याने त्याच्या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आत्महत्या केली आहे. आयुष चव्हाण असे मृताचे नाव असून तो शहरातील गंगापूर रोड परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता.
४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४५ वाजता आयुषने त्याच्या महाविद्यालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
उल्लेखनीय बाब म्हणजे, टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्याने इंस्टाग्रामवर जीवन संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे पोलिसांनी सांगितले. मित्रांनो, ही शेवटची वेळ आहे. आयुष्यात माझे कोणतेही स्वप्न किंवा ध्येय नाही.
मी माझ्या आयुष्याला कंटाळलो आहे. म्हणून, जीवनातून निघून जात आहे, असे तो म्हणाला. गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





