Antibiotics Side Effects : आजकाल अनेक जण अगदी किरकोळ आजार किंवा वेदनांसाठीही एंटीबायोटिक्स घेतात. डॉक्टरांचा सल्ला न घेता अशी औषधे घेणे धोकादायक ठरू शकते. एंटीबायोटिक्समुळे आजार बरा होतो, पण त्याचवेळी शरीरातील चांगले जंतूही नष्ट होऊ शकतात. त्यामुळे ही औषधे घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. १) डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एंटीबायोटिक्स घ्या स्वतःहून किंवा कोणाच्या सांगण्यावरून एंटीबायोटिक्स घेऊ नयेत. प्रत्येक आजारासाठी एंटीबायोटिक्सची गरज नसते. डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधे घ्या. २) औषधांचा कोर्स पूर्ण करा एंटीबायोटिक्स घेतल्यानंतर थोडा आराम मिळाला तरी औषध अर्धवट सोडू नका. कोर्स पूर्ण न केल्यास संसर्ग पुन्हा वाढू शकतो. ३) पोटाच्या आरोग्याकडे लक्ष द्या एंटीबायोटिक्समुळे आतड्यातील चांगले जंतू कमी होतात. त्यामुळे फायबरयुक्त आहार घ्या. कांदा, लसूण, केळी, ओट्स, डाळी, भाज्या आणि फळे खाणे फायदेशीर ठरते. ४) त्रास जाणवत असल्यास योग्य आहार घ्या एंटीबायोटिक्समुळे काही लोकांना जुलाब, पोट फुगणे, पोटदुखी किंवा कळ येऊ शकते. अशावेळी फार जड किंवा जास्त कच्चा आहार टाळावा. पोट दुखत असेल तर आल्याचा चहा किंवा कोमट पाण्यात आले घेणे उपयुक्त ठरते. ५) शरीराला विश्रांती द्या औषधांसोबत पुरेशी झोप, हलका आहार आणि पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीराला बरे होण्यासाठी वेळ द्या. एंटीबायोटिक्स योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक घेतल्यास त्या सुरक्षितही ठरतात आणि आजारावर परिणामकारकही ठरतात.