French Open Badminton 2024 : सात्विक-चिरागचा आणखी एक धमाका, नंबर-1 जोडीचा पराभव करून अंतिम फेरीत मारली धडक…

French Open Badminton 2024 : भारतीय बॅडमिंटन जोडीची उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या जोडीने उपांत्य फेरीत जगातील नंबर वन जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. चिराग आणि सात्विक यांनी फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या सेओ सेउंग जे आणि कांग मिन ह्युक यांचा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय जोडीने शनिवारी रात्री उशिरा उपांत्य फेरीत विद्यमान विश्वविजेत्या कोरियाच्या कांग मिन्ह्युक आणि सेओ सेंगजे यांच्यावर 21-13,21-16 असा शानदार विजय नोंदवला आणि 2024 हंगामातील सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. अव्वल मानांकित आणि माजी पुरुष दुहेरी चॅम्पियन सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी तिसऱ्यांदा BWF सुपर 750 फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत ( Satwik-Chirag duo sails into French Open 2024 final ) पोहोचले आहेत.
रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत भारताच्या अव्वल जोडीचा सामना चीनी तैपेईच्या ली जे-हुई आणि यांग पो-ह्वान यांच्याशी होईल, ज्यांनी उपांत्य फेरीत जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांचा पराभव केला.
सात्विक आणि चिराग यांनी सुरुवातीपासूनच जगातील दोन सर्वोत्तम जोडी विरूध्दच्या सामन्यात वर्चस्व राखले आणि या वर्षाच्या सुरुवातीला इंडिया ओपनमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. विद्यमान विश्वविजेत्या जोडीविरुद्ध पहिला गेम सहज जिंकल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी कोरियन जोडीला दुसऱ्या गेममध्येही पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. भारतीय जोडीने हा सामना अवघ्या 40 मिनिटांत जिंकला.
खेळाच्या सुरुवातीला 5-5 अशी बरोबरी असताना भारतीय जोडीला खडतर संघर्ष करावा लागला तथापि, त्यांनी सलग सहा गुण जिंकून नियंत्रण मिळवले आणि ब्रेकमध्ये 11-5 अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर सात्विक-चिरागने आपला वेग कायम राखला आणि पहिला गेम 21-13 असा सहज जिंकला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/french-open-2024-satwik-chirag-pair-cruises-into-quarterfinals/
पहिल्या गेममध्ये दमदार विजयानंतर सात्विक-चिरागने दुसऱ्या गेममध्येही आपले वर्चस्व कायम ठेवले. खेळाच्या मध्यंतरानंतर कोरियन खेळाडूंनी काहीसा प्रतिकार दाखवूनही भारतीयांची सुरुवातीची आघाडी निर्णायक ठरली आणि त्यांनी दुसरा गेम जिंकत 21-16 असा शानदार विजय नोंदवला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/big-action-against-these-2-star-players-during-wpl-2024-this-punishment-was-given/
दरम्यान, भारतीय जोडीने यापूर्वी हंगामाच्या सुरुवातीला मलेशिया ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु लिआंग वेई केंग आणि वांग चांग या तत्कालीन अव्वल मानांकित चीनी जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता. चिराग-सात्विक यांना इंडिया ओपनच्या अंतिम फेरीत जगज्जेत्यांविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.





