French Open 2024 : इगा स्विटेकने चौथ्यांदा पटकावले फ्रेंच ओपनचे विजेतेपद…

पॅरिस – फ्रेंच ओपन या वर्षातील तिसऱ्या टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोलंडच्या इगा स्विटेकने 12व्या मानांकित इटलीच्या जास्मिन पाओलिनीचा 6-2, 6-1 असा सलग सेटमध्ये पराभव करत रोलँड गॅरोस या लाल मातीवरील स्पर्धेची चौथ्यांदा विजेतेपदक पटकाविले.
Welcome to the three-peat club, Iga 🏆🏆🏆
Our 2024 champion headlines the stat of the day by @Infosys #RolandGarroswithInfosys #ExperiencetheNext pic.twitter.com/VVIu92goH0
— Roland-Garros (@rolandgarros) June 8, 2024
स्विटेकने अशाप्रकारे या स्पर्धेतील आपल्या विजेतेपदाचा यशस्वीरित्या बचाव करतान तिच या रोलँड गॅरोसची अनभिषिक्त राणी असल्याचे सिद्ध केले. स्विटेक 2020, 2022 आणि 2023 मध्ये फ्रेंच ओपनची चॅम्पियन ठरली होती. त्याचवेळी, पाओलिनीने पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, या युवा खेळाडूला जेतेपदाच्या लढतीत स्विटेकसारख्या अव्वल खेळाडूविरुद्ध प्रभाव पाडता आला नाही.
यासह, जस्टिन हेनिन (2007-09) नंतर सलग तीन वेळा फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिली महिला ठरली आहे. स्विटेकने उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित कोको गॉफचा 6-2, 6-4 असा पराभव केला होता. त्याचवेळी अंतिम फेरीतही स्वितेकने पाओलिनीला संधी दिली नाही आणि एकतर्फी विजय मिळवला.
French Open 2024 : गॉफचा पराभव करत ‘इगा स्विटेक’ची अंतिम फेरीत धडक…
याशिवाय 2022 मध्ये स्विटेकने यूएस ओपनचे विजेतेपदही जिंकले आहे. मात्र, या चॅम्पियन खेळाडूकडे ऑस्ट्रेलिया ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद नाही. तिने तिला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (2022) उपांत्य फेरी तर विम्बल्डनमध्ये (2023) उपांत्यपूर्व फेरीच गाठता आली होती.
आज अल्काराझ-झ्वेरेव सामना
स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत शनिवारी उपांत्य फेरीत जॅनिक सिनरचा 2-6, 6-3, 3-6, 6-4, 6-3 असा पराभव करून वर्षातील दुसऱ्या ग्रँड स्लॅम फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह अल्काराज हा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पोहोचणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. अल्काराझने 2022 मध्ये हार्ड कोर्टवर यूएस ओपन, 2023 मध्ये ग्रास कोर्टवर विम्बल्डनचे जेतेपद जिंकले होते आणि आता रोलँड गॅरोसच्या लाल मातीच्या कोर्टवर तो पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी चौथ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हचे आव्हान असेल.





