Elena Rybakina : ऑस्ट्रेलियन ओपनला मिळाली नवी टेनिस सम्राज्ञी! एलिनाने सबालेंकाचं ‘हॅट्ट्रिक’चं स्वप्न मिळवलं धुळीस
Elena Rybakina : एलिना रायबाकिनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अरीना सबालेंकाचा पराभव करत जेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

Elena Rybakina won Australian Open 2026 : रॉड लेव्हर एरिनावर ३१ जानेवारी रोजी खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात टेनिस विश्वाला नवी सम्राज्ञी मिळाली आहे. कझाकस्तानच्या एलिना रायबाकिना हिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अरीना सबालेंका हिचा पराभव करत जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. रायबाकिनाने हा अटीतटीचा सामना २-१ अशा सेटमध्ये जिंकून नवा इतिहास रचला.
तब्बल तीन सेटचा थरार; रायबाकिना ने घेतला बदला –
अरिना सबालेंका या सामन्यात जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती, परंतु रायबाकिनाने सुरुवातीपासूनच तिला दबावाखाली ठेवले. तिने पहिला सेट आपल्या आक्रमक सर्व्हिसच्या जोरावर ६-४ असा जिंकून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सबालेंकाने जोरदार पुनरागमन केले. तिने रिबाकिनाला कडवी झुंज देत ६-४ ने हा सेट जिंकला आणि सामना १-१ च्या बरोबरीवर आणला.
𝐄𝐋𝐄𝐍𝐀 𝐑𝐘𝐁𝐀𝐊𝐈𝐍𝐀 𝐈𝐒 𝐀 𝐓𝐖𝐎-𝐓𝐈𝐌𝐄 𝐆𝐑𝐀𝐍𝐃 𝐒𝐋𝐀𝐌 𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍! 🏆🏆🔥
She defeated World No. 2 and World No. 1 en route to the AO title. 💥🇦🇺
Only one set dropped all tournament. 😤✅
UNSTOPPABLE! 👑#AusOpen #AO26 #ElenaRybakina pic.twitter.com/QqGd9sUC0m
— Sportskeeda Tennis (@SK__Tennis) January 31, 2026
तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये सबालेंका आपली लय टिकवू शकली नाही. रायबाकिनाने जिद्दीने खेळत हा सेट ६-४ ने खिशात घातला आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे रायबाकिनाने २०२३ च्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमधील पराभवाचा वचपाही काढला आहे, जिथे सबालेंकाने तिला मात दिली होती.
एलिना रायबाकिनाने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ चे विजेतेपद जिंकले
रायबाकिनाचे दुसरे ग्रँड स्लॅम आणि विशेष विक्रम –
एलिना रायबाकिनाही ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी कझाकस्तानची पहिली खेळाडू ठरली आहे. तिच्या कारकिर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे; यापूर्वी तिने २०२२ मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. विशेष म्हणजे, २००८ मध्ये मारिया शारापोव्हाने केलेल्या पराक्रमानंतर, ऑस्ट्रेलियन ओपनच्या एकाच स्पर्धेत टॉप-६ खेळाडूंना पराभूत करणारी रायबाकिनाही केवळ दुसरी महिला खेळाडू ठरली आहे.





