दिव्यांगांसाठी मोफत व्हील चेअर व कुबड्यांची सुविधा; छोटे व्यवसाय असोसिएशन, तुळशीबाग पुणे चा स्तुत्य उपक्रम

पुणे : छोटे व्यावसायिक असोसिएशन तुळशीबाग, पुणे तर्फे काल दिनांक 1 जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये तुळशीबाग परिसरामध्ये दिव्यांग व्यक्तींना खरेदीसाठी फिरणे सोपे व्हावे या उद्देशाने असोसिएशन तर्फे मोफत व्हीलचेअर्सची व कुबड्यांची व्यवस्था करण्यात आली.
तुळशी बागेमध्ये प्रवेश करणाऱ्या पाचही रस्त्यांच्या सुरुवातीलाच ही व्यवस्था करण्यात आली असून, कोणत्याही एका प्रवेशद्वारा जवळून व्हीलचेअर अथवा कुबड्या घेऊन इतर कोणत्याही प्रवेशद्वाराजवळ त्या जमा करण्याची व्यवस्था असोसिएशनने केली आहे असे या स्तुत्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजक सागर दहिभाते यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांच्या हस्ते झाले. यावेळी राजाभाऊ धावडे, अरविंद तांदळे, अनिल वेदपाठक, परमेश्वर पवार, मोहन शिंदे, नरेश तडका, ज्ञानेश्वर कोठावळे व इतर मान्यवर उपस्थित होते.





