nagar | नवनागापूर येथे वारक-यासाठी मोफत औषधोपचार केंद्र

नगर, (प्रतिनिधी) – आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्याची आरोग्य सेवा मिळावी या हेतुने डॉ.गडगे रुग्णालय यांनी सुरू केलेले मोफत आरोग्य सेंटर चे उद्घाटन्यो गीराज गगनागिरी महाराज सरला बेट गोदाधाम महंत राष्ट्रसंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
नगर-मनमाड महामार्गावरील नगर तालुक्यातील नवनागापूर येथे ओम सोशल फाउंडेशन व गडगे हॉस्पीटलच्या वतीने पंढरपुर येथे निघालेल्या वारकऱ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत औषधोपचार केंद्र सुरू केले. गेल्या पंधरा वर्षापासून हे फाउंडेशन वारकऱ्याची सेवा करत आहे.
यावेळी डॉ संजीव गडगे, डॉ. सुजाता गडगे, आप्पासाहेब सप्रे, संजय भोर, मनोहर वाघ, रावसाहेब खराडे, सर्जेराव पठारे, रामदास कारखिले, कारभारी क्षेत्रे, बाबासहेब बोरकर नितीन ग०हाणे, संदीप बेल्हेकर, शरद आढाव , भाऊसाहेब गुंजाळ, डॉ महेश कोळेकर, दत्तात्रय चौरे, चंद्रकांत मोरे, डॉ. संजय कोते, सुधीर गायकवाड, संकेत खोडदे, विनायक फाकटकर, सुधीर होले उपस्थित होते.





