विठुरायाच्या पूजेचा मान उगले दाम्पत्याला; नाशिकला सलग दुसऱ्यांदा मिळाली संधी

Ashadhi Ekadashi | आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा पार पडली. यंदा आषाढी महापूजेसाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले (वय ५२) व कल्पना कैलास उगले (वय ४८) यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे.
पूजेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पूजा करण्याचा मान उगले कुटुंबाला मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. कैलास उगले हे एक सर्वसामान्य शेतकरी असून गेल्या १२ वर्षांपासून पंढरपूरची नियमित वारी करत आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले यांनी वारकरी संप्रदायाशी असलेली निष्ठा आणि भक्तिभाव यामुळे वारकऱ्यांत मानाचे स्थान प्राप्त केले आहे.
नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मान
विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी आषाढी महापूजेचा मान मिळाला आहे. मागील वर्षी 2024 मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून बाळू शंकर अहिरे ( वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे (वय ५०) रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक या दापत्याची निवड झाली होती. आता सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील वारकरी दाम्पत्याला हा मान मिळाला आहे. Ashadhi Ekadashi |
दरम्यान, पंढरपूरमध्ये पहाटे अडीच वाजल्यापासून पूजा, टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष सुरू आहे. आषाढीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात १५ लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठलाचे दर्शनाची रांग पाच किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे. चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाली आहे. Ashadhi Ekadashi |
हेही वाचा:
पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा





