Australia vs India 4th Test 2024 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 आता अतिशय रोमांचक वळणावर पोहोचली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत तीन सामने खेळले गेले आहेत. पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकण्यात भारताला यश आले, तर दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून जिंकला. गाबा येथे खेळलेला तिसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यानंतर ही कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारताचा कसोटी विक्रम (Team India Test record in Melbourne) कसा राहिला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मेलबर्नमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू…
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिनने 1991 ते 2011 पर्यंत मेलबर्न क्रिकेट मैदानावर 5 कसोटी सामने (10 डाव) खेळले आहेत. या 10 डावांमध्ये त्याने 44.90 च्या सरासरीने 449 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यानंतर अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीचा क्रमांक लागतो.
सचिन तेंडुलकर (1991-2011) : 5 सामने (10 डाव), 449 धावा (1 शतक/3 अर्धशतक)
अजिंक्य रहाणे (2014-2010) : 3 सामने (6 डाव), 369 धावा (2 शतक/0 अर्धशतक)
विराट कोहली (2011-2018) : 3 सामने (6 डाव), 316 धावा (1 शतक/2 अर्धशतक)
विरेंद्र सेहवाग (2003-2011) : 2 सामने (4 डाव), 280 धावा (1 शतक/1अर्धशतक)
मेलबर्नमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-4 भारतीय खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. जसप्रीत बुमराहने 2018 ते 2020 पर्यंत मेलबर्न क्रिकेट मैदानावर 2 कसोटी सामने (4 डाव) खेळले आहेत. या 4 डावात त्याने 13.06 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या आहेत. यानंतर अनिल कुंबळे आणि कपिल देव यांचा क्रमांक लागतो.
जसप्रीत बुमराह (2018-2020) : 2 सामने 15 बळी
अनिल कुंबळे (1999-2007) : 3 सामने 15 बळी
कपिल देव (1981-1991) : 3 सामने 14 बळी
आर. अश्विन (2011-2020) : 3 सामने 14 बळी
मेलबर्नमधील गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताची कामगिरी
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 14 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या 14 कसोटी सामन्यांपैकी दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले, चार कसोटी सामने भारताने जिंकले तर 8 कसोटी सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांच्या निकालांबद्दल बोलायचे झाल्यास, भारत ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहे. 2014 ची मेलबर्न कसोटी अनिर्णित राहिली होती. 2018 ची मेलबर्न कसोटी 137 धावांनी जिंकण्यात भारताला यश आले होते, तर 2020 ची मेलबर्न कसोटीही भारताने 8 विकेटने जिंकली होती. जर भारताने 2024 ची मेलबर्न कसोटी जिंकली तर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तो भारताचा हॅट्ट्रिक कसोटी विजय असेल. जे आजपर्यंत भारताला करता आलेले नाही.
भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया : 14 कसोटी सामन्याचा निकाल
1-5 जानेवारी 1948 : ऑस्ट्रेलिया 233 धावांनी विजयी
6-10 फेब्रुवारी 1948 : ऑस्ट्रेलिया एक डाव आणि 177 धावांनी विजयी
30 डिसेंबर 1967 – 3 जानेवारी 1968 : ऑस्ट्रेलिया एक डाव आणि 4 धावांनी विजयी
30 डिसेंबर 1977 – 4 जानेवारी 1978 : भारत 222 धावांनी विजयी
7-11 फेब्रुवारी 1981 : भारत 59 धावांनी विजयी
26-30 डिसेंबर 1985 : सामना अनिर्णित
26-29 डिसेंबर 1991 : ऑस्ट्रेलिया 8 विकेट्सने विजयी
26-30 डिसेंबर 1999 : ऑस्ट्रेलिया 180 धावांनी विजयी
26-30 डिसेंबर 2003 : ऑस्ट्रेलिया 9 गडी राखून विजयी
26-29 डिसेंबर 2007 : ऑस्ट्रेलिया 337 धावांनी विजयी
26-29 डिसेंबर 2011 : ऑस्ट्रेलिया 122 धावांनी विजयी
26-30 डिसेंबर, 2014 : सामना ड्रॉ
26-30 डिसेंबर 2018 : भारत 137 धावांनी विजयी
26-29 डिसेंबर 2020 : भारत 8 गडी राखून विजयी