Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC कडून मोठी अपडेट, India vs Pakistan सामन्यांबाबतही घेतला मोठा निर्णय…

India vs Pakistan Champions Trophy 2025 : आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत मोठी माहिती शेअर केली आहे. ही स्पर्धा केवळ हायब्रीड मॉडेलनुसारच होणार असल्याचे आयसीसीनं स्पष्ट केलं आहे, त्यानुसार टीम इंडिया आपले सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळेल. मात्र, आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेसाठी टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे बीसीसीआयचा मुद्दा मान्य करत आयसीसीने हायब्रीड मॉडेलला मान्यता दिली आहे. यासोबतच ICC ने पाकिस्तानला एक दिलासादायक बातमी दिली आहे.
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसह पुढील 3 वर्षांसाठी टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामन्यांबाबत निर्णय घेतला आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित माहिती आपल्या वेबसाइटवर शेअर केली आहे. आयसीसीने सांगितले की, “आगामी 2024 ते 2027 या कालावधीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने हे हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केले जातील. हे दोन्ही संघ तटस्थ ठिकाणी आपले सामने खेळतील. हा नियम आयसीसीच्या आगामी स्पर्धांना लागू असणार आहे. आता ICC लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक शेअर करणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
JUST IN: ICC issues update on Champions Trophy 2025 venue.
Details 👇https://t.co/aWEFiF5qeS
— ICC (@ICC) December 19, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफीसह ‘या’ स्पर्धा होणार हायब्रीड मॉडेलनुसार…
आयसीसीने म्हटले आहे की, “चॅम्पियन्स ट्रॉफीसह इतरही स्पर्धा आहेत ज्या हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केल्या जातील. महिला विश्वचषक 2025 देखील याच मॉडेलवर होणार आहे. याचे आयोजन भारतात केले जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघ आता भारतात खेळायला येणार नाही. पुरुषांची T20 विश्वचषक 2026 स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धाही हायब्रीड मॉडेलमध्ये होणार आहे.”
पाकिस्तानसाठी दिलासादायक बातमी…
आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. महिला T20 विश्वचषक 2028 पाकिस्तानमध्येच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला होस्टिंगचे अधिकार देण्यात आले असून ही स्पर्धाही हायब्रीड मॉडेलने होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानमध्ये आपले सामने खेळणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक कधी येईल ..
चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप आलेले नाही. पण हायब्रीड मॉडेलच्या पुष्टीनंतर अपेक्षा वाढल्या आहेत. या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आयसीसीने म्हटले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठीही आनंदाची बातमी…
आयसीसीने ऑस्ट्रेलियासह पाकिस्तानलाही आनंदाची बातमी दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आयसीसी वरिष्ठ महिला स्पर्धांचे यजमानपद मिळाले आहे. आता 2029 ते 2031 या कालावधीत महिला क्रिकेटच्या ICC स्पर्धा फक्त ऑस्ट्रेलियातच होणार आहेत.





