शिक्रापुरात चार, तळेगाव ढमढेरेत दोन रुग्णांची वाढ
Updated On:

शिक्रापूर -येथे चार तर तळेगाव ढमढेरे येथे दोन बाधित आढळले आहेत.शिक्रापूर येथे आजी आजारी असल्याने आजीचा मुलगा तिला भेटण्यासाठी आला होता. तो मुलगा बाधित असल्याने आजीलाही संसर्ग झाला आहे.
दोघांना त्रास होऊ लागल्याने आजी व मुलाची तपासणी केली असता त्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याच परिसरात राहणाऱ्या वारंवार बाहेर प्रवास करणाऱ्या अशा एका युवकाने स्वतः तपासणी केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शिक्रापूर इकोग्राम सोसायटीमध्ये राहणाऱ्या 13 वर्षीय युवतीला सर्दीचा त्रास होत असल्याने तिची तपासणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.





