माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गायब? संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता, थेट अमित शहांना लिहिले पत्र

Sanjay Raut Letter to Amit Shah | माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर ते दिसेनासे झाल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. यावर चिंता व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता या थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांना पत्र लिहीले आहे.
उपराष्ट्रपतींच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल चिंता या पात्रातून व्यक्त करण्यात आली आहे. सोबतच जगदीप धनखड यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याबाबत तातडीने माहिती देण्याची मागणी ही पत्रातून केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. Sanjay Raut Letter to Amit Shah |
पत्रात नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?
खासदार संजय राऊत यांनी पत्रात लिहिले आहे की, मी आपल्याला हे पत्र अत्यंत गंभीर आणि चिंतेच्या परिस्थितीत लिहित आहे. देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा पसरत आहेत, ज्यामुळे आम्ही सर्वजण चिंतेत आहोत.
Hon.Home Minister
Shri @AmitShah ji
Jay hind! pic.twitter.com/uxAgRKPUKk— Sanjay Raut (@rautsanjay61) August 11, 2025
संजय राऊत यांनी पत्रात पुढे लिहिले, 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कामकाज सुरू केले. कामकाजादरम्यान ते ठीक दिसत होते. मात्र, संध्याकाळी 6 वाजेनंतर अचानक उपराष्ट्रपतींनी तब्येतीचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर घडलेल्या काही गोष्टी धक्कादायक आणि चिंताजनक आहेत, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. Sanjay Raut Letter to Amit Shah |
जगदीप धनखड त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत
माजी उपराष्ट्रपती नेमके कुठे आहेत? त्यांची प्रकृती ठीक आहे की नाही? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा अधिकार जनतेला आहे. राज्यसभेतील काही सदस्यांनी उपराष्ट्रपतींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. दिल्लीत अशा अफवा सुरू आहेत की, जगदीप धनखड यांना त्यांच्या निवासस्थानीच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे आणि ते सुरक्षित नाहीत. ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचा विचार करत आहे. मात्र, त्याआधी गृहमंत्र्यांकडून माहिती घेणे योग्य वाटले. उपराष्ट्रपतींच्या सध्याच्या स्थितीबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल योग्य माहिती मिळावी अशी अपेक्षा राऊतांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. Sanjay Raut Letter to Amit Shah |
हेही वाचा :
आज लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर होणार ; विधेयकात काय विशेष ?, वाचा सविस्तर





