माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला न्यायालयाचा दणका, बलात्कार प्रकरणी दोषी; आज ठोठावणार शिक्षा

Prajwal Revanna | जनता दल (सेक्युलर)चे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला अखेर बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णा याला चार लैंगिक शोषण व बलात्कार प्रकरणांपैकी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. यानंतर आज (२ ऑगस्ट) विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट हे त्याला शिक्षा सुनावणार आहेत.
हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील गन्निकाडा फार्महाऊसमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेशी संबंधित हा खटला आहे. २०२१ मध्ये तिच्यावर दोनदा बलात्कार झाल्याचा आरोप असून, आरोपीने हे कृत्य त्याच्या मोबाईलवर चित्रित केले आहे. बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या प्रज्वल रेवण्णाविरुद्ध चार वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्धच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
दोषी ठरवल्यानंतर प्रज्वल रेवन्ना भावूक
बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर प्रज्वल रेवन्ना भावूक झाला आणि कोर्टातून बाहेर पडतानाही तो रडत होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर 14 महिन्यात या खटल्यात निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणातील खटला १८ जुलै रोजी संपला आणि ३० जुलै रोजी न्यायालयाने आदेश राखून ठेवण्यात आला होता. या प्रकरणात पीडितेने कोर्टात सादर केलेली साडी महत्त्वाचा पुरावा ठरली आहे. विशेष तपास पथकाने या गुन्ह्यात 123 पुरावे सादर केले होते. Prajwal Revanna |
प्रज्वलविरुद्ध बलात्कार, छेडछाड, ब्लॅकमेलिंगचे एफआयआर दाखल केले. एसआयटीने आपल्या तपासात उघड केले की प्रज्वलने ५०हून अधिक महिलांचे लैंगिक छळ केले होते. या महिला २२ ते ६१ वयोगटातील होत्या. Prajwal Revanna |
लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रज्वल रेवण्णाशी संबंधित प्रकरण उघडकीस
रेवण्णा यांचे आजोबा एच.डी.देवेगौडा हे भारताचे माजी पंतप्रधान असून त्यांचे वडील एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. २६ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रज्वल रेवण्णाशी संबंधित अश्लील व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह प्रसारित झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. होलेनारसीपुरा टाऊन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यासंदर्भात जर्मनहून बंगळूरु विमानतळावर पोहोचल्यानंतर गेल्या वर्षी ३१ मे रोजी ‘एसआयटी’ने त्याला अटक केली होती. Prajwal Revanna |
हेही वाचा :
महाराष्ट्र हादरला..! घरात घुसून महिला पोलिसाची हत्या; तर एका नेत्यावर चाकूहल्ला, अमरावतीत तणाव





