Prajwal Revanna : बलात्कार प्रकरणी माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला जन्मठेप

बंगळुरू : कर्नाटकच्या बंगळुरू येथील जनता दल सेक्युलर पक्षाचे माजी खासदार आणि पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि १० लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. बलात्कार आणि अश्लील व्हिडीओ काढल्याप्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी त्याला दोषी ठरवले होते. दरम्यान, हा निर्णय जनता दल सेक्युलर पक्षाला (जेडीयू) हा मोठा झटका मानला जात आहे.
कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील गन्निकाडा फार्महाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या ४८ वर्षलत्य केल्याप्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णाला दोषी ठरविण्यात आले होते. २०२१ मध्ये पीडितेवर दोनदा बलात्कार झाल्याचा आरोप असून, प्रज्ज्वल रेवण्णाने हे कृचत्यई त्यालब चित्रित केले होते. सरकारी वकिलांनी रेवण्णा हा निर्ढावलेला आरोपी असून त्याने बलात्कारासारखे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय कृत्य वारंवार केल्याचे म्हणत त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. रेवण्णा याला कठोर शिक्षा झाली तर असा गुन्हा करण्यापूर्वी कोणीही दहावेळा विचार करेल आणि समाजात योग्य तो संदेश जाईल, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
पीडित महिलेच्या बाजूने युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील बी. एन. जगदीश यांनी सांगितले की, गरीब आणि अशिक्षित असलेली ही महिला घरकाम करून दरमहा 10,000 रुपये कमवते. तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला, तिला ब्लॅकमेल करण्यात आले आणि तिला घर सोडून पळून जाण्यास भाग पाडले. गुन्हेगार हा प्रभावशाली व्यक्ती असून त्याने तिला सहजपणे लक्ष्य केले. आपला अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर तिने आत्महत्येचा विचारही केला होता, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
प्रज्ज्वल हा खासदार म्हणून निवडून आला, त्याला कायद्याची पूर्णपणे जाण आहे. मात्र असे असतानाही आरोपीने लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्ड करणे ही त्याची मानसिकता काय आहे हे दर्शवण्यासाठी पुरेसे आहे. प्रज्ज्वल रेवण्णा हा निर्ढावलेला गुन्हेगार असून त्याने असली कृत्ये वारंवार केली आहेत. यातल्या एकहा कृत्याबद्दल त्याला पश्चाताप झालेला नाही, हे न्यायालयाने लक्षात घेणे गरजेचे आहे, असा युक्तीवाद केला.





