BCCI : मिथुन मन्हास यांच्यानंतर प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांना मोठी जबाबदारी; BCCI मध्ये करणार ‘हे’ काम

BCCI Executive Committee announced : बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर माजी क्रिकेटपटू आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा यांना पुरुष निवड समितीत स्थान देण्यात आले. याशिवाय, तमिळनाडूचे माजी फलंदाज एस. शरत यांची कनिष्ठ निवड समितीत पुनर्नियुक्ती झाली, तर अमिता शर्मा यांची महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
मिथुन मन्हास यांची अध्यक्षपदी निवड
मिथुन मन्हास हे बीसीसीआयचे 37वे अध्यक्ष बनले असून, जम्मू-कश्मीरमधून या पदावर विराजमान होणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. मन्हास यांनी आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 157 सामन्यांत सुमारे 9,714 धावा केल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशासकीय भूमिका स्वीकारली. ते जम्मू आणि कश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या उपसमितीचे सदस्य होते. याशिवाय, आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) आणि गुजरात टायटन्सच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.
पुरुष निवड समितीत बदल –
The 94th Annual General Meeting of the Board of Control for Cricket in India BCCI has just concluded in Mumbai.
Take a look at all the key decisions made 🔽https://t.co/sHt2sCbcaI
— BCCI (@BCCI) September 28, 2025
माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांना पुरुष निवड समितीत समाविष्ट करण्यात आले आहे. अजित अगरकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत शिव सुंदर दास आणि अजय रात्रा हे अन्य सदस्य आहेत. एस. शरत आणि सुब्रतो बनर्जी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली. अर्जदारांमध्ये प्रवीण कुमार, अमय खुरासिया, आशीष विंस्टन झैदी आणि शक्ती सिंह यांचाही समावेश होता.
हेही वाचा – Mithun Manhas : BCCI च्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची निवड! कोण आहेत मन्हास? जाणून घ्या
महिला निवड समितीचे नेतृत्व अमिता शर्मा यांच्याकडे –
नीतू डेविड यांच्या जागी माजी भारतीय वेगवान गोलंदाज अमिता शर्मा यांची महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. 116 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या अमिता यांच्यासोबत श्यामा डे, जया शर्मा आणि श्रावंती नायडू या समितीत असतील. त्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 दरम्यान भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या महिला विश्वचषकानंतर सुरू होईल.
हेही वाचा – IND vs PAK : आशिया कप फायनलमध्ये भारताचा विजय निश्चित! काय आहे कारण? जाणून घ्या
कनिष्ठ निवड समितीत एस. शरत यांचे पुनरागमन
तमिळनाडूचे माजी फलंदाज एस. शरत यांची कनिष्ठ निवड समितीत पुन्हा नियुक्ती झाली आहे. यामुळे बीसीसीआयच्या निवड प्रक्रियेत अनुभव आणि नव्या दृष्टिकोनाचा समतोल साधला जाणार आहे. या निर्णयांमुळे बीसीसीआयच्या प्रशासकीय आणि निवड प्रक्रियेत नव्या नेतृत्वाला संधी मिळाली असून, भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत.





