Nepal-India Relations : परराष्ट्र सचिव मिस्री नेपाळच्या दौऱ्यावर, जाणून घ्या कारण…..

काठमांडू – परराष्ट्र सचिव नेपाळच्या दौऱ्यावर असून त्यांनी तेथील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन विविध द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली आहे. नेपाळचे परराष्ट्र सचिव सेवा लामसल यांच्या निमंत्रणावरून मिस्री दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत.
मिस्री यांनी नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौंडेल आणि पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचीही भेट घेतली. नेपाळमध्ये प्रचंड यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर ओली यांचे सरकार सत्तेवर आले. या बदलत्या राजकीय समिकरणांच्या पार्श्वभुमीवर मिस्री यांनी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी नेपाळला भेट दिली आहे.
Bangladesh Crisis : यूके ते यूएसए…! बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद…
मिस्री आणि नेपाळच्या शहरी विकास मंत्रालयाचे सचिव मणिराम गेलाल यांनी संयुक्तपणे काठमांडू येथे भारताच्या भूकंपोत्तर पुनर्निर्माण अनुदानांतर्गत बांधलेल्या नेपाळ भाषा परिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. २०१५ साली नेपाळमध्ये आलेल्या भूकंपात राजधानी काठमांडूच्या नारादेवी परिसरातील इमारतीचे नुकसान झाले होते.




