World Championships : पॅरिस गेम्ससाठी पात्र होण्यावर लक्ष – बजरंग पुनिया

नवी दिल्ली – जागतिक चॅम्पियनशिपद्वारे पॅरिस गेम्ससाठी पात्र होण्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. पुढील वर्षे हे एक महत्त्वाचे वर्ष आहे. आशियाई आणि जागतिक स्पर्धांमध्ये काय अंतर असेल हे अद्याप आम्हाला माहीत नाही. परंतु या दोन स्पर्धा एक किंवा दीड महिन्यांच्या अंतराने झाल्यास मी दोन्हीमध्ये स्पर्धेत सहाभागी होईन, असा विश्वास भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने व्यक्त केला आहे.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या आधी सरावासाठी बजरंग रविवारी यूएसएला रवाना होणार आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बजरंग म्हणाला, ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर 2024 मध्ये आणखी चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. मी पुन्हा प्रशिक्षण घेत आहे. गेल्या चार ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीच्या माध्यमातून पदके मिळाली आहेत. कांस्य आणि रौप्यपदके आहेत पण सुवर्ण नाही. पॅरिस गेम्ससाठी हेच माझे लक्ष्य आहे.
दरम्यान, चीनमधील वाढत्या कोविड महामारीमुळे 2022 आशियाई स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून आयोजकांनी अद्या स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर केल्या नाहीत. तसेच सप्टेंबर 2023 मध्ये रशियामध्ये होणारी जागतिक स्पर्धा ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा असेल.





