Bajrang Punia : काँग्रेस सोड अन्यथा…! बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी; परदेशी नंबरवरून व्हॉट्सअँप मेसेज

Bajrang Punia – हरियाणाचा कुस्तीपटू बजरंग पुनिया यांना काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन दिवसांनी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही धमकी त्यांना व्हॉट्सअँप मेसेजद्वारे मिळाली होती.
त्यांना एका परदेशी क्रमांकावरून व्हॉट्सअँपवर मेसेज आला असून त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेसने बजरंग पुनिया यांना अखिल भारतीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवले आहे.
व्हॉट्सअँप मेसेजमध्ये बजरंग यांनी काँग्रेस सोडावी, अन्यथा तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भले होणार नाही, असे लिहिले आहे. हा आमचा शेवटचा संदेश आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही काय आहोत ते दाखवून देऊ. तुम्हाला कुठेही तक्रार करायची असेल तर ही आमची पहिली आणि शेवटची चेतावणी आहे.
बजरंग पुनिया यांनी सोनीपतमधील बहलगढ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.





