सहजपूरमध्ये रायरेश्वर पॅनलला पाच जागा

नांदूर – सहजपूर (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात आठ अपक्षांसह तिरंगी लढतीत अकरा जागांपैकी रायरेश्वर पॅनलने पाच जागा पटकाविल्या. यामध्ये जय मल्हार विकास पॅनलने तीन तर जनसेवा पॅनलने तीन जागेवर विजय मिळविला. तर यावेळी आठ अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दिग्गज नेते, मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
रायरेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- काजल विशाल म्हेत्रे, अर्चना विठ्ठल म्हेत्रे, सारिका सुशील कांबळे, स्वाती अविनाश होले, बापू दगडू थोरात.
माजी उपसभापती व दौंड पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सुशांत दरेकर यांच्या बालेकिल्ल्यात जय मल्हार विकास पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. त्यानंतर सरपंच आरक्षण सोडतीनंतर ग्रामपंचायतीत कोणाचे बहुमत होणार, याकडे सर्व पॅनल प्रमुखांसह उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
आम्ही मागील पाच वर्षांमध्ये गावामध्ये विकास केला आहे. या विकासाच्या जोरावर आम्ही गावांमध्ये उमेदवार उभे केले होते. जनतेने काही ठिकाणी आम्हाला व आम्ही केलेल्या काम पाहून 5 उमेदवार निवडून दिले आहेत. आमचा काही ठिकाणी पराभव झाला असून जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. गावकऱ्यांचे आभार मानतो.
– सुशांत दरेकर, सदस्य, पंचायत समिती, दौंड.





