Pune District : रॅगिंगला ठाम विरोध करा : अॅड. पौर्णिमा घुमटकर
Pune District : रॅगिंगची घटना घडल्यास अथवा त्याची शक्यता जाणवल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता तातडीने महाविद्यालयीन प्रशासन किंवा संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी. रॅगिंगमुक्त आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे, असे ड. पौर्णिमा घुमटकर यांनी सांगितले.

राजगुरुनगर : रॅगिंग ही केवळ मजा किंवा मस्करी नसून, त्याचे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने रॅगिंगला ठामपणे विरोध करून त्याविरोधात आवाज उठविला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वकील अॅड. पौर्णिमा घुमटकर यांनी केले.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात रॅगिंगविरोधी सप्ताहानिमित्त रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ड. घुमटकर यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगचे विविध प्रकार, त्याचे दुष्परिणाम, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच रॅगिंगविरोधी कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एम. जगताप यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनात परस्परांचा आदर, सहकार्य आणि बंधुभाव जपण्याचे आवाहन केले. महाविद्यालयात रॅगिंगला कोणत्याही प्रकारे थारा दिला जाणार नसून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रॅगिंगची घटना घडल्यास अथवा त्याची शक्यता जाणवल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता तातडीने महाविद्यालयीन प्रशासन किंवा संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी. रॅगिंगमुक्त आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे, असे ड. पौर्णिमा घुमटकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. एस. एम. जगताप, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. तुषार वेहळे, विज्ञान विभागप्रमुख प्रा. आरती इंदाईस, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. जी. आहेरकर, प्रा. अल्फिया इनामदार, क्रीडा विभागप्रमुख प्रा. मोनाली काळे, रॅगिंगविरोधी समितीच्या प्रमुख प्रा. रुचिका कोकणे, प्रा. कोमल मांडगे, प्रा. मोनिका जाधव, प्रा. ऐश्वर्या दौंडकर, प्रा. केतकी गावडे, प्रा. हर्षदा कोळी, प्रा. ज्योती राळे, प्रा. श्रुती पाटील, प्रा. किशोरी गुजर, प्रा. जयश्री बढे, प्रा. कोमल कालेकर, प्रा. निकिता कारले, प्रा. योगिता डुंबरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निकिता कारले यांनी केले, तर प्रा. किशोरी गुजर यांनी आभार मानले.





