Baramti News : बारामतीत भरदिवसा थरार! राणा शिपिंग कंपनीच्या मालकावर गोळीबार
Baramti News : बारामती विमानतळ परिसरात एका नामांकित उद्योजकावर झालेल्या प्राणघातक गोळीबाराने संपूर्ण बारामती शहर व पुणे जिल्हा हादरून गेला आहे.

Baramti News : बारामतीमधील राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामती विमानतळाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात राणा सूर्यवंशी यांच्या हातामध्ये गोळी शिरली असून, त्यांना उपचारासाठी बारामती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Baramti News)
सध्या मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राणा सूर्यवंशी हे बारामती विमानतळ परिसरात असताना हा प्रकार घडला. हल्लेखोरांनी अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने आधी त्यांच्याजवळ येऊन पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने त्यांची दिशाभूल केली आणि अचानक त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. (Baramti News)
या हल्ल्यात राणा सूर्यवंशी यांच्या हातामध्ये गोळी घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर तात्काळ राणा सूर्यवंशी यांना बारामतीमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. (Baramti News)
त्यांची प्रकृती आणि हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या घटनेची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे तसेच रुग्णालयाकडे धाव घेतली. (Baramti News)
विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, हल्लेखोर कोण होते आणि या हल्ल्यामागे व्यावसायिक स्पर्धा, जुना वाद की इतर काही कारण आहे, याचा कसून शोध घेतला जात आहे. (Baramti News)




