Dasara Melava : संविधान रक्षणाची धगधगती मशाल बनून या! ठाकरेसेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर समोर
दरवर्षीच्या परंपरेनुसार ठाकरेसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) होत आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे.

Dasara Melava : दरवर्षीच्या परंपरेनुसार ठाकरेसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) होत आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी तसेच एसआयआर प्रक्रिया रोखण्यासाठी विरोधकांचे जे आंदोलन सुरू आहे, त्यात ठाकरेसेनाही सामील झालेली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेच्या दस-या मेळाव्याचा एक टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
संविधान रक्षणाची धगधगती मशाल बनून या, असे आवाहन या टिझरमधून करण्यात आले आहे. ठाकरेसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) २० ऑक्टोबर रोजी दादर येथील ऐतिहासिक शिवतीर्थ मैदानावर होणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला व्हिडिओ टिझर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याद्वारे राज्यभरातील शिवसैनिकांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना हा विचार आहे. शिवसेना म्हणताना सळसळते आणि तापते रक्त हीच आमची ओळख आहे. निष्ठा हीच आमची ओळख आहे. प्रत्येकाच्या हृदयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत.
संविधान रक्षणाची
धगधगती मशाल
बनून या,
वाजत-गाजत
गुलाल उधळत या!दसरा मेळावा २०२६
स्थळ – शिवतीर्थ, दादर
वेळ – सायं. ५:०० वाजता https://t.co/xZGJT4TpFr— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 18, 2026
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…, अशी विधाने असलेला उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ या टिझरमध्ये (Dasara Melava) दाखवण्यात आला आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणती राजकीय भूमिका मांडतात. विरोधकांवर कसा हल्लाबोल करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






