Baramti News : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जगतापांचे बंड; राष्ट्रवादी-शिवसेनेची नवी यादी जाहीर; शरदचंद्र पवार गटही मैदानात
Baramti News : बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी (३० सप्टेंबर) अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या.

Baramti News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी (दि. ३०) राजकीय घडामोडींना वेग आला. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून जाहीर झालेली उमेदवारी नाकारत भाजपसोबत स्वतंत्र पॅनेल मैदानात उतरविले.
त्यामुळे जगताप यांनी बंडाचे निशाण फडकावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने शिवसेना (शिंदे गट)ला एक जागा देत सोबत घेतले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती युगेंद्र पवार यांनी दिली. (Baramti News)
राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी-शिवसेना (शिंदे गट)च्या पॅनेलची यादी जाहीर केली. यावेळी युवा नेते जय पवार, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, नगराध्यक्ष सचिन सातव, सभापती किरण तावरे उपस्थित होते. (Baramti News)
राष्ट्रवादीने सुरुवातीला जाहीर केलेल्या यादीत पुरुषोत्तम जगताप यांना उमेदवारी दिली होती. मात्र, जगताप हे स्वतंत्र पॅनेल उभे करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने राष्ट्रवादीला उमेदवारांची यादी बदलावी लागली.
त्यानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या सहकार्याने स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली. यावेळी माजी आमदार संजय जगताप, राष्ट्रवादीचे सुदाम इंगळे आणि माणिकराव झेंडे उपस्थित होते. (Baramti News)
राष्ट्रवादी-शिवसेना पॅनेलचे उमेदवार; सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल
सर्वसाधारण गट क्र. १ – निंबूत-खंडाळा : अभिजित सतीश काकडे (निंबूत), प्रमोद भगवानराव काकडे (निंबूत), डॉ. वसंतराव रामराव दगडे (निरा-शिवतक्रार).
गट क्र. २ – मुरुम-वाल्हा : विक्रम आनंदराव भोसले (वाणेवाडी), ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड (करंजेपूल), राजवर्धन शिवाजीराव शिंदे (मुरुम).
गट क्र. ३ – होळ-मोरगाव : रवींद्र जयवंतराव भापकर (लोणी भापकर), मकरंद चंद्रकांत सस्ते (सस्तेवाडी), मनिषा आनंदकुमार होळकर (सदोबाचावडी).
गट क्र. ४ – कोरहाळे-सुपा : राजेंद्र हरीभाऊ बोरकर (बोरकरवाडी), अक्षय धनंजय खलाटे (माळवाडी-लाटे), सुनील नारायण भगत (कोरहाळे बुद्रुक).
गट क्र. ५ – मांडकी-जवळार्जून : सतीश संपत जगताप (मांडकी), सुधाकर ज्ञानोबा टेकवडे (जवळार्जून), उत्तम महादेव धुमाळ (जेऊर).
ब वर्ग प्रतिनिधी : संग्राम तानाजी सोरटे (सोरटेवाडी).
इतर मागास प्रवर्ग : शैलेश पंढरीनाथ रासकर (खंडोबाचीवाडी).
भटक्या जाती व विमुक्त जाती : अशोक चंद्रकांत धायगुडे (आंदोरी, ता. खंडाळा).
अनुसूचित जाती-जमाती : द्वारकोजी गुलाब साळवे (वडगाव निंबाळकर).
महिला राखीव : प्रणिता मनोज खोमणे (कोरहाळे खुर्द), छबुबाई अंकुश नाझिरकर (नाझरे).
राष्ट्रवादी-सेनेकडून आजी-माजी ११ जण पुन्हा रिंगणात
राष्ट्रवादी-शिवसेना पॅनेलकडून विद्यमान संचालकांपैकी अभिजित काकडे, शैलेश रासकर, ऋषिकेश गायकवाड, राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, सुनील भगत आणि प्रणिता खोमणे या सात जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. (Baramti News)
याशिवाय मागील संचालक मंडळात असलेले प्रमोद काकडे, वसंतराव दगडे, उत्तम धुमाळ आणि सुधाकर टेकवडे या चार माजी संचालकांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. (Baramti News)
मंत्री मकरंद पाटील यांनी सुचविल्यानुसार खंडाळा येथून अशोक चंद्रकांत धायगुडे यांना संधी देण्यात आली आहे. वसंतराव दगडे यांच्या माध्यमातून शिवसेना (शिंदे गट)ला राष्ट्रवादीने पॅनेलमध्ये सामावून घेतले आहे. (Baramti News)
पुरुषोत्तम जगताप-भाजप पॅनेलचे उमेदवार; लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनेल
सर्वसाधारण गट क्र. १ – निंबूत-खंडाळा : महेश काशिनाथ काकडे (निंबूत), संतोष पोपटराव थोपटे, संभाजी मुगुटराव घाडगे (पिंपरे).
गट क्र. २ – मुरुम-वाल्हा : पुरुषोत्तम रामराजे जगताप (वाणेवाडी), सतीश रामचंद्र सकुंडे (वाघळवाडी), वैभव अशोक गायकवाड (करंजेपूल).
गट क्र. ३ – होळ-मोरगाव : अमर आनंदराव होळकर (सदोबाचीवाडी), राहुल दत्तात्रय भापकर (लोणी भापकर), संतोष ज्ञानदेव दरेकर (वडगाव निंबाळकर).
गट क्र. ४ – कोरहाळे-सुपा : सचिन जवाहर खलाटे (लाटे), गोरख बाबुराव खोमणे (कोरहाळे खुर्द), अनिल नारायण जगताप (जळगाव सुपे).
गट क्र. ५ – मांडकी-जवळार्जून : विश्वास लक्ष्मण जगताप (मांडकी), शामराव तुकाराम धुमाळ (जेऊर), अरविंद शिवाजी शेंडकर (पिंपरी).
इतर मागास प्रवर्ग : नीलेश हरीभाऊ केदारी (मोरगाव), धनंजय बाबुराव गडदरे (गडदरवाडी).
महिला राखीव : मंजिरी दीपक निगडे (गुळुंचे), वंदना संभाजी गरुड (बेलसर).
अनुसूचित जाती-जमाती : मिलिंद बळवंत कांबळे (होळ).
ब वर्ग गट : महेश महादेव राणे (जवळार्जून).
जगताप-भाजप पॅनेलकडून सहा आजी-माजी मैदानात
लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनेलकडून उमेदवारी देताना विद्यमान अध्यक्ष व संचालक पुरुषोत्तम जगताप, विश्वास जगताप आणि मिलिंद कांबळे या तिघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच महेश काकडे, सचिन खलाटे आणि महेश राणे या माजी संचालकांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरित १५ जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. (Baramti News)
शरदचंद्र पवार गटाची यादी लवकरच
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. (Baramti News)
‘जगताप यांनी वेगळा निर्णय घेतला, याचे दुःख’ – जय पवार
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष तसेच अजित पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करत स्वतंत्र पॅनेल उभे केले. याबाबत राष्ट्रवादीचे नेते जय पवार म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना अजितदादांनी नेहमीच साथ दिली आहे. त्यामुळे ते असा निर्णय घेतील, असे वाटले नव्हते. त्यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही मुद्द्यांवर त्यांनी खंत व्यक्त केली. (Baramti News)
अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशीदेखील जगताप यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न झाला. दादा सोडून गेल्याचे दुःख कार्यकर्त्यांना असायला हवे होते; मात्र तसे काही दिसले नाही, असेही जय पवार यांनी सांगितले. पॅनेल तयार करताना जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Baramti News)





