बिहारमध्ये आंदोलकांवर गोळीबार; विजेसाठी रास्ता रोको करणाऱ्या एकाचा मृत्यू, दोन गंभीर

कटिहार – बिहारमधील कटिहार जिल्ह्यात वीज विभागाच्या विरोधात रास्ता रोको करणाऱ्या एका व्यक्तीचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. 5 जणांना गोळ्या घातल्याचा आरोप ग्रामस्थ करत असून त्यात तिघांचा मृत्यू झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून मात्र केवळ एकाच्या मृत्यूला दुजोरा देण्यात आला आहे.
खुर्शीद आलम (34) असे त्याचे नाव असून तो बसल गावचा रहिवासी आहे. दुसरीकडे, बारसोईच्या चापाखोड पंचायतीत राहणारे नियाज आलम (वय 32) यांची प्रकृती चिंताजनक आहे. बारसोई उपविभागात बुधवारी दुपारी वीज विभागाच्या विरोधात अनेक जण वीज कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आले होते.
प्राणपूरच्या बस्तौल चौक आणि बारसोई ब्लॉक मुख्यालयाचा मुख्य रस्ता जाम करून लोकांनी निदर्शने केली. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस पोहोचले, मात्र संतप्त लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला





