फटाक्यांच्या कारखान्यात अचानक स्फोट; आठ जणांचा मृत्यू, दहा जण गंभीर जखमी
Updated On:

Firecracker Factory । तामिळनाडूतील विरुधुनगर येथे शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान आठ जण ठार, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना वेंबकोट्टई पोलीस ठाण्यांतर्गत एका ठिकाणी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात सायंकाळी अचानक स्फोट झाला.
या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये बरेच नुकसान झाल्याचे दिसून येते. या स्फोटामुळे कारखान्यातील एक संपूर्ण युनिट उद्ध्वस्त झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दरम्यान, स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.




