शिवण्यातील इमारतीच्या पार्किगमध्ये आग; 13 दुचाकी व 2 रिक्षा जळून खाक

शिवणे, शिवणे येथे आज पहाटे पाच वाजता पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली आहे. शिवण्यातील शिंदे पुलाजवळ, शिवकमल प्रेस्टीज इमारतीच्या पार्किगमध्ये ही आग लागली असून या आगीमध्ये 13 दुचाकी व 2 रिक्षा जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाने आग विझवली असून यामध्ये कोणीही जखमी नाही. येथील स्थानिक नागरिकांनी वेळेच घटनास्थळी धाव घेतली व अग्नीशमन दलाला आगीची माहिती दिली. त्यामुळ वेळेत आग विझवणे शक्य झाले. स्थानिकांनी ही आग लावण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या इमारतीला आग लागल्यानंतर पार्किंगमधील गाड्यांचा स्फोट होण्यास सुरुवात झाली स्फोटाच्या आवाजाने येथील नागरीकांनी धाव घेतली. सुरुवातीला घटनास्थळी चार ते पाच जणांनी धाव घेतली त्यावेळी पार्किंगमध्ये असलेले विद्यूत मिटरसह इमारतीमधील विद्यूत सुद्दा चालू होती. यावेळी वेळीच सावध होत येथील आनंद वद्राबादे या तरुणाने इमारतीचा विद्यूत पुरवठा खंडीत केला. यामुळे मोठा अनर्थ टळला.
अग्निशमन दलाचे अधिकारी उमराटकर यांनी सांगितले की, पार्किंगमध्ये अनेकदा शॉट सर्किट होऊन तेथील वाहनांना आग लागल्याचे दिसून येते. मात्र, या इमारतीतील विद्युत मीटरचे बॉक्सना आगीची झळ पोहचली नाही. त्यामुळे तेथून आग लागली नाही. ज्या वाहनाला पहिली आग लागली, त्याच्यावर पार्किंगमधील ट्युबलाईट जळाली आहे





