Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसीतील फ्लोटेक इंजिनिअरिंग कंपनीला आग
कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झालेले नाही.

Bhosari MIDC: भोसरी एमआयडीसीतील डी-३, टी-ब्लॉक येथील फ्लोटेक इंजिनिअरिंग कंपनीला (दि. ७ नोव्हेंबर) आग लागली होती. मुख्य अग्निशमन केंद्र, नेहरूनगर, भोसरी यांसह एकूण पाच अग्निशमन केंद्रांतील अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना झाली.
घटनास्थळी पाहणी केली असता कंपनीतील इलेक्ट्रिकल मोटर स्टोअर रूम तसेच कार्यालयातील कागदपत्रे व फाइल्सना आग लागल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन जवानांनी तातडीने होजलाईन आणि होजरीलच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझविली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झालेले नाही.
साई चौकातील व्यावसायिक इमारतीतील आग नियंत्रणात
साई चौक, पिंपरी येथील दुकानाला आग लागल्याची वर्दी प्राप्त झाल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इमारतीमध्ये मोबाइल दुकान तसेच दुसऱ्या मजल्यावर कपड्यांचे दुकान आहे. कपड्यांच्या दुकानाला लावण्यात आलेल्या बॅनरच्या आणि इमारतीच्या मधील मोकळ्या जागेत साठविण्यात आलेल्या कचऱ्याला व वेस्टेज कार्डबोर्ड बॉक्सला आग लागली होती.
जवानांनी तत्काळ होजलाइनच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर शिडीच्या सहाय्याने वर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. जळणारे वेस्टेज साहित्य बाजूला करून उर्वरित आग पूर्णपणे विझविण्यात आली. तसेच इमारतीमधील इतर कोणत्याही दुकानाचे नुकसान झाले नसल्याची खात्री करण्यात आली.
Smartphone Purchases: आकर्षक सवलती, कॅशबॅक, फायनान्स सुविधांमुळे स्मार्टफोन खरेदीला प्रतिसाद




