Smartphone Purchases: आकर्षक सवलती, कॅशबॅक, फायनान्स सुविधांमुळे स्मार्टफोन खरेदीला प्रतिसाद
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन मोबाइल खरेदी करण्याची ग्राहकांची पसंती

कामशेत– दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कामशेत शहरातील मोबाइल शॉपींमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. विविध मोबाइल कंपन्या आणि विक्रेत्यांकडून आकर्षक सवलती, विशेष ऑफर्स आणि भेटवस्तू दिल्या जात असल्याने ग्राहकांचा मोबाइल खरेदीकडे कल वाढला आहे.
नवीन मोबाइल खरेदी करण्याबरोबरच जुना मोबाइल बदलून नवीन घेण्यासही ग्राहक पसंती देत आहेत. कमी किमतीतील स्मार्टफोनपासून महागड्या प्रीमियम मोबाईलपर्यंत विविध मॉडेल्सना मागणी आहे. मोबाइल खरेदीवर मिळणाऱ्या भेटवस्तू, कॅशबॅक, सवलती आणि फायनान्स सुविधांचाही ग्राहक लाभ घेत आहेत.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन मोबाइल खरेदी करण्याची ग्राहकांची पसंती आणि सणासुदीच्या विशेष ऑफर्स यामुळे विक्रेत्यांच्या व्यवसायाला चालना मिळत आहे. त्यामुळे कामशेतमधील मोबाइल बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘परवडणाऱ्या किमतीत उत्तम मोबाइल मिळावेत, यासाठी विशेष सवलती, फायनान्स सुविधा आणि आकर्षक भेटवस्तूंची व्यवस्था केली आहे. ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदा दिवाळीत मोबाइल खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’ – शंभू मोबाईल शॉप, कामशेत
Jyoti Waghmare : २०२९ पूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? महिला खासदाराच्या दाव्याने खळबळ





