पुणे जिल्हा | गुळुंचवाडीतील मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत

बेल्हे, (वार्ताहर) – गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथे 19 जुलै 2024 रोजी कल्याण-नगर महामार्गावर भरधाव ट्रकने नागरिकांना चिरडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला होता.
अपघातात मृत्यू पडलेल्या या पाचही जणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 3 लाख रुपये अर्थसहाय मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झाले होते.
या पीडित कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचे धनादेश आमदार अतुल बेनके यांनी सुपूर्द केले.
या अपघातात शीतल योगेश दाते (वय 30) व मुलगा रियांश योगेश दाते (वय 5, रा. अणे, ता. जुन्नर),
दत्तात्रय लक्ष्मण गोसावी (वय 62, रा. गुळुंचवाडी, ता. जुन्नर) यांचा जागीच तर नंदाराम पाटील बुवा भांबेरे (वय 80 रा. गुळुंचवाडी, ता. जुन्नर) व धोंडीभाऊ सदशिव पिंगट (रा. बेल्हे ता. जुन्नर) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता तर 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले होते.
या अपघातात गुळुंचवाडी, बेल्हे व अणे गावातील काही जिवाभावाची मास्से आपण गमावली. खरे तर हे नुकसान आणि हानी कधीही न भरून येणारी आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे.
या पीडित कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी मी पाठपुरावा केला होता.
पीडित कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झालेल्या प्रत्येकी तीन लाखांच्या आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द केले. या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार अतुल बेनके यांनी आभार मानले.





