अवघ्या २३ वर्षी मैथिली पाटीलला अखेरचा निरोप; स्वप्नांचा अंत अन् कुटुंबीयांचा आक्रोश

Maithili Patil | एअर इंडियाचं विमान 12 जूनला अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक एअरपोर्टला निघालं होतं. या विमान दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. यामध्ये महाराष्ट्रातील मैथिली पाटीलनं देखील जीव गमावला. मैथिली पाटील या 23 वर्षीय तरुणीवर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. न्हावा येथील रहिवासी असलेली मैथिली एअर होस्टेस होती.
घटनेच्या सहा दिवसांनंतर तिचा मृतदेह गावी आणण्यात आला. अनेक मृतदेह जळाल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण होते. त्यामुळे मैथिलीच्या आई-वडिलांची डीएनए चाचणी करण्यात आली. डीएनए जुळल्यानंतर, मैथिलीचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला होता.
“राधे…राधे” असं म्हणत कुटुंबियांचा एकच आक्रोश
मैथिलीचा मृतदेह रात्री उशिरा कुटुंबियांच्या ताब्यात मिळाला. त्यानंतर, आज सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी कुटुंबीय ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना झाले. सकाळी 7 वाजता ते मुंबई विमानतळावर पोहोचले आणि तेथून पनवेल न्हावा येथील घरी आले. यावेळी “राधे…राधे” असं म्हणत कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. जे पाहून मनं हेलावून गेले. Maithili Patil |
दरम्यान, घडलेल्या घटनेच्या आदल्या दिवशी, मैथिली कुटुंबासोबत जेवण करून अहमदाबादला गेली होती. दुसऱ्या दिवशी, तिने आईला विमानातून शेवटचा फोन केला. मात्र हा फोन शेवटचा ठरला आणि विमान अपघातात तिने आपला जीव गमावला. मैथिलीला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. Maithili Patil |
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या मैथिली पाटील हिचे वडील मोरेश्वर पाटील ओएनजीसी कंपनीत काम करतात. तिने बारावीपर्यंत शिक्षण टी. एस. रेहमान कॉलेजमध्ये घेतले. त्यानंतर एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण केले. मैथिलीने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एअर इंडियामध्ये नोकरी सुरु केली होती. दोन वर्षांपासून ती एअर इंडियामध्ये कार्यरत होती. मैथालीच्या पश्चात आई – वडील, बहिण आणि भाऊ असा परिवार आहे. मात्र तिच्या अचानक जाण्याने पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. Maithili Patil |
हेही वाचा:
मोठ्या अपघातानंतर पुन्हा तेच घडलं! अहमदाबाद-लंडन एअर इंडियाचे विमान रद्द, पण अनर्थ टळला





