मोठ्या अपघातानंतर पुन्हा तेच घडलं! अहमदाबाद-लंडन एअर इंडियाचे विमान रद्द, पण अनर्थ टळला

Air India Flight Cancelled | अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-159 तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेले विमान १:१० वाजता लंडनला जाणार होते. विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होत आहे.
आतापर्यंत एअर इंडियाने इतर कोणत्याही विमानाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे लोक विमानतळावर विमानाची वाट पाहत होते. एअर इंडियाच्या विमानात सतत तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
एका प्रवाशाने सांगितले की, मी लंडनला जात होतो, माझे तिकीट एअर इंडियाचे आहे. आत गेल्यावर मला कळले की, विमान रद्द झाले आहे, मी काय झाले असे विचारले तेव्हा त्यांनी कोणतेही योग्य उत्तर दिले नाही. त्यांच्याकडे कोणतीही योग्य माहिती नव्हती. जर विमान देखभालीसाठी गेले असेल तर किमान त्यांनी ते सांगावे. परतफेडीच्या प्रश्नावर ते ऑनलाइन जाण्यास सांगत आहेत.
त्याच वेळी, दुसऱ्या व्यक्तीने सांगितले की, मी सकाळी पावसात बाहेर गेलो होतो, माझ्या मुलीला लंडनला जायचे होते. आम्हाला सांगण्यात आले की, विमान रद्द झाले आहे. विमानतळ प्रशासन कोणतेही योग्य कारण देताना दिसत नाहीत. Air India Flight Cancelled |
एअर इंडियाच्या सेवेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, सोमवारी देखील एअर इंडियाच्या AI-2493 एअरबस A321-211 (VT-PPL) या विमानात तांत्रिक बिघाड दिसून आला होता. त्यामुळे उड्डाणाला विलंब झाला होता. तसेच उड्डाणही रद्द करण्यात आले होते. हे विमान अहमदाबादहून मुंबईहून जाणार जाणार होतं. खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड दिसून येते आहे. मात्र यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच एअर इंडियाच्या सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. Air India Flight Cancelled |
इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
तर दुसरीकडे, कोच्चीहून दिल्लीकडे निघालेल्या इंडिगो विमानाला (फ्लाइट नं. 6E 2706) मंगळवारी (17 जून 2025) दुपारी बॉम्ब धमकीच्या भीतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अचानक इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. Air India Flight Cancelled |
या घटनेमुळे विमानतळावर काही वेळ गोंधळ आणि पळापळीचे चित्र निर्माण झाले. विमान सकाळी 9.20 वाजता कोचीहून उड्डाण करून दुपारी 12.35 वाजता दिल्लीत पोहोचणार होते. मात्र, मध्यंतरी धोक्याचा इशारा मिळाल्याने ते नागपुरात वळवण्यात आले. Air India Flight Cancelled |
हेही वाचा:
५ दिवसांत दुसरा CDS ठार ! इस्रायलचा इराणवर आणखी एक मोठा हल्ला ; जाणून घ्या अली शादमानी कोण होते ?





